Manasi kulkarni biography of albert
Marathi Actress : अभिनेत्रीचं 10 वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक, स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
Marathi Actress : अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिचं जवळपास 10 वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक झालं आहे. मानसी ही नव्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
By : जयदीप मेढे | Updated at : 03 Jun 2024 07:53 PM (IST)
Marathi Actress
Marathi Actress : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 17 जून पासून 'थोडं तुझं थोडं माझं' ही मालिका सुरु होणार आहे.
ही मालिका दररोज रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve), अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjpe) हे दोघे मुख्य भमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे प्रोमोमधून शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणजेच गायत्री आणि तेजस लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे गायत्री प्रभू.
या मालिकेत गायत्री प्रभूच्या भूमिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णी (Manasi Kulkarni) ही आहे. मानसीने या मालिकेच्या माध्यमातून जवळपास 10 वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे.
कशी आहे गायत्रीची भूमिका?
गायत्रीचा माणसांपेक्षा पैशांवर जास्त विश्वास आहे. प्रभू कुटुंबाची भली मोठी वास्तू आणि प्रतिष्ठा पाहूनच तिने या घरची सून होण्याचा निर्णय घेतला.
त्यामागचा काय उद्देश आहे ते मालिका बघताना उलगडेल.गायत्री हुशार आणि स्वावलंबी आहे. ती फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे. तिचा रेकॉर्ड आजवर कुणीच मोडलेला नाही. गायत्रीला समोरच्या व्यक्तीला हरताना पाहायला आवडतं.
Rachael copes biographyती कधीच कोणाला स्वत:समोर जिंकू देत नाही, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.
मानसीने व्यक्त केल्या भावना?
दरम्यान 10 वर्षांनी कमबॅक केल्यानंतर मानसीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी तिने म्हटलं की, 'गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते.
आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरु असते. त्यामुळेच गायत्रीला आव्हान देणारा तेजस आणि तिचा फिनिशिंग कॉलेजमधला रेकॉर्ड मोडू पहाणाऱ्या मानसीला ती अद्दल घडवू इच्छिते. गायत्रीचा लूक मला फारच आवडला. मुळात मला साडी नेसायला खूप आवडतं. गायत्रीच्या लूकसाठी डिझाईन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत. 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात ही हटके व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.'
कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
दरम्यान ही मालिका दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री 9 वाजता तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रदर्शित करण्यात येते. पण आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा :
Lok Sabha Result 2024 : निकालापूर्वीच बॉलीवूडच्या 'या' खानने देशातील हवा ओळखली, पंतप्रधान मोदी आणि भाजपचं केलं अभिनंदन
अधिक पाहा..
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी!
धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल